Audit

  • सर्व साधारण कामाचे स्वरुप

सर्व साधारण कामाचे स्वरुप

नाशिक मनपाच्या दैनंदिन कामकाजाचे लेखापरिक्षण काम मुख्यत्वे लेखापरिक्षण विभागामार्फत करण्यात येते. यासाठी पुर्व लेखापरिक्षण,तसेच कार्योत्तर लेखापरिक्षण अशा लेखापरिक्षणाच्या दोन पध्दती अमलात आहे. मनपाच्या खर्च विषयक प्रकरणांचे पुर्व लेखापरिक्षण करण्यात येते तर महसुल/उत्पन्न विषयक बाबींचे कर्योत्तर लेखापरिक्षण करण्यात येते.लेखापरिक्षणाचे काम मुख्यालयात तसेच सर्व सहा विभागिय कार्यालय,यांत्रिकी कार्यशाळेत करण्यात येते. यासाठी वेगवेगळी पथके कार्यरत आहे. लेखापरिक्षणात आढळणार्‍या त्रुटी बाबत अभीप्राय नोंदवुन संबधित विभागास अवगत केले जाते. तसेच महत्वाच्या बाबी मा.स्थायी समिती तसेच मा.आयुक्‍तांच्या निदर्शनास आणण्यात येतात. लेखापरिक्षण विभागामार्फत केलेल्या कामाचा अहवाल दरमहा मा.स्थायी समितीस सादर केला जातो. तसेच कार्योत्तर लेखापरिक्षणादरम्यान आढळलेल्या त्रुटी बाबत अधिनियमातील तरतुदीनुसार मा.स्थायी समितीस अहवाल सादर करण्यात येतो.